‘मला माझ्या सर्व क्षमता प्रत्येकासाठी वापरायच्या आहेत ‘, प्रजासत्ताक दिनी म्हणाले संघप्रमुख

RSS chief Mohan Bhagwat : मला माझ्या सर्व क्षमता प्रत्येकासाठी वापरायच्या आहेत कारण प्रत्येकजण माझा आहे. आपल्या देशातील लोक वैविध्यपूर्ण दिसतात पण हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आम्ही विविधतेला वेगळेपणा मानत नाही. आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असल्याचे पाहतो. ही शक्ती कोठून आली, ही शक्ती नेहमीच होती, परंतु ती तेव्हाच प्रभावी होते जेव्हा आपण बंधुभावाच्या समुदायात एकत्र राहू, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याहस्ते नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते.

‘आम्ही विविधतेला वेगळेपणा मानत नाही’

श्री. भागवत पुढे म्हणाले की, मला माझ्या सर्व क्षमता प्रत्येकासाठी वापरायच्या आहेत कारण प्रत्येकजण माझा आहे. आपल्या देशातील लोक वैविध्यपूर्ण दिसतात पण हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. आम्ही विविधतेला वेगळेपणा मानत नाही. अशा प्रकारे बंधुभावाच्या भावनेने सर्वांनी मिळून देशासाठी काम केले, संविधानाची शिस्त पाळली, त्याच्या पावित्र्याला धक्का न लावता, त्याच्या भावनेचा योग्य वापर केला तर देश नक्कीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. हे करण्यासाठी, आपल्यामध्ये समर्पण असणे आवश्यक आहे. आज जगाला भारताकडून काय अपेक्षा आहेत आणि भारताकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत, जागतिक नेता बनण्यासाठी आपण आपली कर्तव्ये समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.