महत्त्वाची बातमी! १०-१२वी बोर्डाच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने बोर्ड परीक्षेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. बोर्डाच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणासाठी नवीन अभ्यासक्रम आराखडा सुरू करण्यात आला आहे. ज्यामध्ये 2024 पासून बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील असे सांगण्यात आले आहे.
 यासंदर्भात केंद्रीय शैक्षणिक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना वर्षातून दोनदा बोर्डाची परिक्षा देणे बंधनकारक असेल, असं ते म्हणाले. तसेच विद्यार्धांना जेईईसारख्या अभियांत्रिकी प्रवेश परिक्षेला वर्षातून दोनदा बसण्याचा पर्याय असेल.
याशिवाय, ११ वी आणि १२ वीमध्ये विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. यासह विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेतील उत्तम गुण कायम ठेवण्याची मुभा असेल. यामुळे विद्यार्थांना चांगले गुण मिळतील.