भुसावळ : भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच रेल्वे प्रशासनातर्फे आग्रा विभागामधील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंगचे तर पलवल-मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी काही मेल व एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यावर परिणाम परिणाम होणार आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या आणि त्यांच्या कालावधी असा असेल.
११०५७ दादर-अमृतसर एक्स्प्रेस (२० जानेवारी ते ०३ फेब्रुवारी), ११०५८ अमृतसर-दादर एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी),
१२१४७ कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (३० जानेवारी), १२१४८ हजरत निजामुद्दीन-कोल्हापूर एक्स्प्रेस (१ फेब्रुवारी).
१२१७१ मुंबई – हरिद्वार सुपर एक्स्प्रेस (२२ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी), १२१७२ हरिद्वार-मुंबई (२३ जानेवारी ते २ फेब्रुवारी),
१२६२९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी) १२६३० हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते ०७. फेब्रुवारी),
१२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस (२१ जानेवारी ते ०४ फेब्रुवारी), १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस (२३ जानेवारी ते ०६ फेब्रुवारी).
१२७५१ नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस (२६ जानेवारी आणि ०२ फेब्रुवारी) १२७५२ जम्मूतावी-नांदेड एक्स्प्रेस (२६ जानेवारी आणि ०४ फेब्रुवारी).
१२७५३ नांदेड-हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्स्प्रेस (२३ व ३० जानेवारी), १२७५४ हजरत निजामुद्दीन-नांदेड एक्स्प्रेस (२४ व ३१ जानेवारी).
भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस (२८ जानेवारी ते ६ फेब्रुवारी), १२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ एक्स्प्रेस (२६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी) या गाड्या रद्द असतील.