महात्मा गांधी विद्यालयात २३ वर्षानंतर फुलला मैत्रीचा मळा; शालेय जीवनातील प्रवास उलगडला

पारोळा : तालुक्यातील मंगरूळ येथील महात्मा गांधी विद्यालयाची सन १९९९ ते २००० ची दहावीची बॅच’चा स्नेहमेळा नुकताच पार पडला. तब्बल २३ वर्षानंतर मित्र एकमेकांना भेटल्याने मैत्रीचा मळा फुलला. अध्यक्षस्थानी के. जे. गुजराथी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भरत सोनवणे उपस्थित होते.

शालेय जीवन प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुवर्ण पान असतं. शालेय जीवनातील दंगा, मस्ती, मैत्री हे सारं अविस्मरणीय असते. कारण हे शालेय जीवनातील सारं विश्व निरपेक्ष आणि निस्वार्थ कुठलीही दांभिकता नसल्याने सौख्यवर्षाव होतो. याचं साऱ्या आठवणींची शिदोरी तब्बल २३ वर्षानंतर साऱ्यांनी शालेय जीवनातील आपापला प्रवास उलगडत शिदोरी रीती करीत आनंदाश्रूनी वाट मोकळी करून दिली. या आनंदाश्रूनी नात्यांची वीण अधिकच घट्ट झाली.

काहींनी शिक्षका विषयी कुतज्ञता व्यक्त केली तर काहींनी मित्रांच्या कडू-गोड आठवणी सांगून कार्यक्रमात रंगत आणली. दरम्यान साईलीला हौस्पिटलचे संचालक डाँ. प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त करून गत आठवणींना उजाळा दिला. डॉ.राजेंद्र जाधव, विनोद पाटील, भुषण कोतकर, समाधान पाटील, ग्यानिराम पाटील, अनिता पाटील, साधना पाटील यांनी समयोचित भाषणे केली. यावेळी एल.एस.पाटील, व्ही.एस.सूर्यवंशी ए. एन. घोलप, बी. एन. माळी, एम डी. भामरे, बी. के. कदम, एन पी संदनशिव, जे. एस. बोरसे, जगन्नाथ जाधव,धोंडू पाटील, आय एस नेतकर, सुभाष पाटील उपस्थित होते.