बिश्रामपूरमध्ये पंतप्रधान मोदींनी निवडणूक रॅलीला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यात काँग्रेसची सत्ता येताच नक्षल दहशतवादाच्या बातम्या वाढत जातात. काँग्रेसचे सरकार आहे आणि तिथे फक्त लुटमारीचा धंदा सुरू आहे.
भाजपच्या योजना आणि पक्षाने दिलेल्या आश्वासनांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. पंतप्रधान म्हणाले, “सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. उज्ज्वला योजनेपासून महिला आरक्षणापर्यंतचे मुद्दे भाजप सरकारने पूर्ण केले आहेत. अयोध्येतील राम मंदिराचे आम्ही जे वचन दिले होते ते पूर्ण केले आहे.
पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात अमली पदार्थांची तस्करी खूप वाढली आहे. ते म्हणाले, “राज्यातील अनेक मुली बेपत्ता झाल्या आहेत, मात्र काँग्रेस नेत्यांकडे याबाबत उत्तर नाही.” राज्यात आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत, पण काँग्रेस यावर उत्तर देत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, काँग्रेसने देशात अनेक दशके सरकार चालवले, मात्र त्यांनी गरिबांना केवळ खोटी आश्वासने दिली. “नेत्यांनी आपले खिसे भरले आहेत. “गरिबी हटवणार, असे सांगतानाच काँग्रेसचे नेतेच श्रीमंत झाले.”
महादेवाच्या नावानेही घोटाळा – पंतप्रधान मोदी
काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने जनतेचा विश्वासघात करण्याशिवाय काहीही केले नाही. महादेव अॅप प्रकरणाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी काँग्रेसलाही धारेवर धरले.
पंतप्रधान म्हणाले, “काँग्रेसनेही महादेवाच्या नावावर घोटाळा केला आहे. आज देशात आणि परदेशात महादेव घोटाळ्याची चर्चा होत आहे. काँग्रेसने तुमच्या मुलांना सट्टेबाजीचे काम करायला लावले आहे.”
पीएम मोदी म्हणाले की, आदिवासी भागात एकलव्य शाळा बांधल्या जात आहेत. मुलाने आपल्या राज्याच्या भाषेत शिक्षण घेतले तर तो कधीही डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ शकत नाही, असा नियम काँग्रेसने केला होता. काँग्रेसने डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यासाठी इंग्रजी अनिवार्य केले होते. भाजप सरकारने ब्रिटिशांची ही मानसिकता संपवली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देश स्वतंत्र झाला पण काँग्रेसच्या मनातून इंग्रजीचे भूत गेले नाही.