सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ सचिवालयात भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. या भरती मार्फत डेप्युटी फील्ड मॅनेजर पदासाठी रिक्त जागा आहेत. कॉम्प्युटर सायन्स/ITसाठी ८० पदे रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी ८० पदे रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एकूण १६० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात B.E/B.Tech किंवा M.Sc पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी उमेदवारांनी वयोमर्यादा ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक
एवढा पगार मिळेल:
या नोकरीसाठी उमेदवारांना ९५००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
असा करावा लागणार अर्ज?
नोकरीचे ठिकाणी दिल्ली असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीबाबत संपूर्ण माहिती https://cabsec.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तु्म्हाला इर्ज पोस्ट बॅग नंबर,००१, लोढी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली ११०००३ येथे पाठवायचा आहे.