महामार्ग ओलाडत होता तरुण, भरधाव वाहनाने दिला जबर धडक

जळगाव : भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे महामार्ग ओलांडत असताना तरूणाच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्राला वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघतात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून,  तात्कळ ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.

यावल तालुक्यातील रिधोरी येथील तरूण राजू सपकाळे (३०)  हा त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीपी ७५४५) ने वरणगावकडून जळगाव दिशेने जात होता. त्यावेळी वांजोळा रोडवर जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा ओलांडत असतांना १२ चाकी ट्राला क्रमांक (जीजे १९ वाय १४०७) ने धडक दिली. या अपघात राजू सपकाळे हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यानंतर ट्रालावरील चालक हा वाहन सोडून पसार झाला. जखमी झालेल्या तरूणाला रूग्णवाहिकेतून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.