---Advertisement---

महायुतीच्या विजयासह मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत; आमदार किशोर पाटलांचे हनुमानाला साकडे

---Advertisement---

पाचोरा : नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान व्हावेत व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्या यासाठी शहरातील श्रीराम मंदिरात हनुमान चालीसा पठण व महा आरती करण्यात आली. श्री महावीर हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधत पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने सकाळी ११ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण व महाआरती करण्यात आली.

मंदिर परिसर सियावर रामचंद्र की जय , पवनपुत्र हनुमान की जय ,भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,तालुका प्रमुख सुनील पाटील,भाजपचे कोष्याध्यक्ष कांतीलाल जैन,रमेश वाणी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,युवा नेता सुमीत पाटील,युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन,तालुका प्रमुख अनिल पाटील, भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वाणी,निवडणूक प्रबंधन समिती सदस्य सुनिल पाटील,शहराध्यक्ष दिपक माने, युवा मोर्चाचे समाधान मुळे, विधानसभा विस्तारक गोविंद शेलार,माजी शहराध्यक्ष रवी पाटील,माजी नगराध्यक्ष शरद पाटे,दत्ता जडे,नगरसेवक गंगाराम पाटील,राम केसवानी, बंडू चौधरी,सुधीर शेलार,शेतकरी संघाचे उपसभापती नरेंद्र पाटील,शहर प्रमुख सुमीत सावंत,भोला पाटील,हेमंत चव्हाण,किशोर भोई,सुरज शिंदे, छोटू चौधरी,एकनाथ पाटील,सनी शिरसाट यांचेसह महायुतीतील भाजपा, शिवसेना, मनसे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच राम व हनुमान भक्तांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment