महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर चढल्याने गोंधळ, सपाच्या 100 कार्यकर्त्यांवर FIR, काय म्हणाले मुख्यमंत्री योगी ?

उत्तर प्रदेशातील मैनपुरी हे हायप्रोफाईल सीट आता एका नव्या वादामुळे चर्चेत आले आहे. समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव आणि या जागेवरील पक्षाच्या उमेदवार डिंपल यादव यांनी काल रात्री मैनपुरीमध्ये रोड शो केला. यादरम्यान समाजवादी पक्षाचे काही समर्थक महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावर चढले.

त्यावर समाजवादी पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता. समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप आहे. या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘सपा कार्यकर्त्यांच्या या कृतीबाबत त्यांनी या घराणेशाही पक्षांकडून काय अपेक्षा ठेवता येईल, असे म्हटले आहे. ते त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित आहेत. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्सचा कोणताही राष्ट्रीय अजेंडा नाही. हा अजेंडा स्वतःचा परिवार आहे.