Maharashtra Politics : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकारला कुठलाही धक्का या निर्णयाने लागला नाही. याचसंदर्भात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान,सत्तासंघर्षानंतर संजय राऊत यांनी सरकार बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. यावर शहाजी पाटील यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे.
काय म्हणाले शहाजी पाटील?
शहाजी पाटील म्हणाले की, राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरच महाराष्ट्र शांत होईल. संजय राऊतांना शांत केलं नाही तर ते महाराष्ट्राला शांत राहू देणार नाहीत. ते आमच्यावर तुटून पडतेत, शरद पवारांवर तुटून पडतेत अन् फडणवीसांवरही तुटून पडतेत. महाराष्ट्राचा मालक होऊन बसलेत. रोज सकाळी उठसुट कुणाचाही समाचार घेतात. आता मलाच त्यांचा शाब्दिक समाचार घ्यावा लागेल, असं पाटील म्हणाले.