महाराष्ट्रात आगामी चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, कुठे कुठे कोसळणार पाऊस?

मुंबई/जळगाव : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असून असह्य करणाऱ्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र आता राज्यातील नागरिकांना लवकरच उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. कारण हवामान खात्याने राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आजपासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यानुसार पावसाचा येलो जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस?
आज हवामान विभागानं राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अकोला, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा यांचा समावेश आहे. अमरावती आणि नागपूरमध्ये आज वीजांच्या गडगडासह मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

Image

११ आणि १२ मेला या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
११ मे रोजी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा,छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर १२ मे जळगावसह २८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र या पावसाने उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला.