---Advertisement---

महाराष्ट्रात पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना; आरोपीला पोलीस कोठडी

---Advertisement---

बदलापूर येथे मुलींवर झालेल अत्याचार आणि यातून पेटून उठलेला महाराष्ट्र हे प्रकरण ताजे असतानाच आता ठाणे जिल्ह्यात देखील माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

येथे एका नराधमाने दोन वर्षाच्या निष्पाप मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींच्या अत्याचारात वाढ झाली असून आधी कोलकाता, मग बदलापूर आणि आता ठाणे यामुळे स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून दुपारी गावाबाहेर निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. मुलीला असह्य वेदना होऊ लागल्याने ती रडत घरी पोहोचली.

मुलगी रडताना पाहून पालकांनी तिला कारण विचारले, मात्र ती अजूनही रडतच होती. तेव्हा आई-वडिलांना वाटले की, मुलीला काहीतरी झाले असावे. दोघेही आपल्या मुलीला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, तेथे मुलीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी टिटवाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून पुढील तपास सुरु आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment