महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी 17 हजार पोलीस शिपायांची भरती होणार असल्याची घोषणा झाली होती. परंतु भरती प्रक्रिया जाहीर होत नव्हती. अशातच आता राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे
पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई आणि कारागृह कॉन्स्टेबल अशा पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावी पास उमेदवारांना नोकरीची ही मोठी संधी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 5 मार्च पासून सुरु झाली. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) पोलीस शिपाई – 9373
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
2) पोलीस बॅन्डस्मन –
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10वी उत्तीर्ण.
3) पोलीस शिपाई-वाहन चालक- 1576
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
4) पोलीस शिपाई-SRPF- 3441
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
5) कारागृह शिपाई – 1800
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी, 18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला ४५० रुपये शुल्क भरावे लागेल.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३५० रुपये शुल्क भरावं लागणार आहे.
उमेदवारांना या प्रक्रियेतून जावे लागणार
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराची पहिल्यांदा शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात निवड करून त्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.