महाराष्ट्र कृषी विभागात मोठी भरती जाहीर झाली असून यासाठी 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 असणार आहे.
एकूण पदे : 60
या पदांसाठी होणार भरती?
1) लघुटंकलेखक 28
2) लघुलेखक (निम्न श्रेणी) 29
3) लघुलेखक (उच्च श्रेणी) 03
काय आहे आवश्यक पात्रता?
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
तुम्हाला इतका पगार मिळेल?
लघुटंकलेखक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) -38600-122800 (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी)- 41800-132300 (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
जाहिरात (Notification): पाहा