महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये नोकरीचा गोल्डन चान्स ; तब्बल 4497 रिक्त जागांवर भरती

महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये सरकारी नोकरी मिळविण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागाने विविध गट ब आणि क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार wrd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीसाठी आवश्यक पात्रता, नोंदणी आणि भरतीशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील तपासू शकतात.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 03 ते 24 नोव्हेंबर दरम्यान सुरू राहणार आहे. या भरती मोहिमेद्वारे 4497 रिक्त जागा भरण्याचे भरती मंडळाचे उद्दिष्ट आहे.

रिक्त पदाचे नाव :
वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 नोव्हेंबर 2023
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online