तरुणभारत लाईव्ह । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससीने विविध रिक्त पदे भरण्यासाठी नुकतीच भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. एकूण 1333 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार असून त्यानुसार पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
या भरतीसाठी 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरतीद्वारे उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय आणि लिपिक-टंकलेखक ही पदे भरली जाणार आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM) पर्यंत आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
उद्योग निरीक्षक – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
कर सहायक – (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
तांत्रिक सहायक – पदवीधर
बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय – (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक – (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
तुम्हाला किती पगार मिळेल?
उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय- ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते.
तांत्रिक सहायक, विमा संचालनालय : रुपये २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
कर सहायक : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
बेलिफ व लिपिक / लिपिक-टंकलेखक : १९९००-६३२०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]