महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! एमपीएससी कृषी सेवाअंतर्गत जम्बो भरती सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससी कृषी सेवा (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे २५८ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे. आणि १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामळे इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

कोणती पदे भरली जाणार?
उप संचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. यात उप संचालक कृषी पदासाठी ४८ जागा रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकारी पदासाठी ५३ जागा रिक्त आहेत. कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर पदांसाठी १५७ जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. याबाबत सर्व माहिती https://mpsc.gob.in/ या वेबसाइटवर माहिती देण्यात आली आहे.