महाराष्ट्र हादरला! तब्बल 59 अल्पवयीन मुलांची होणार होती तस्करी, त्यापूर्वीच भुसावळ…

भुसावळ : बिहार राज्यातील 59 अल्पवयीन मुलांची  तस्करी होत असताना रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग यंत्रणेने कारवाई करीत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. भुसावळसह मनमाड रेल्वे स्थानकावर मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अटकेतील संशयितांनी अल्पवयीन मुलांना सांगली येथील मदरसा येथे नेत असल्याची माहिती दिली असलीतरी संबंधिताकडे कुठलाही पुरावा नसल्याने तस्करीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
01040 दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याची तक्रार आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळात 29 तर मनमाडमध्ये 30 मुलांची सुटका केली. या प्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात भादंवि 370 अन्वये तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.