नवी दिल्ली । महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यातच आता बँक ऑफ बडोदानेही महिलांची बचत वाढवण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
बँक ऑफ बडोदाच्या म्हणण्यानुसार या योजनेचा महिलांना मोठा फायदा होणार आहे. विशेष बाब म्हणजे पोस्ट ऑफिससह कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियानंतर बँक ऑफ बडोदा ही योजना सुरू करणारी देशातील तिसरी सार्वजनिक बँक ठरली आहे.
खरेतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महिला आणि मुलींसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र नावाने एक लहान बचत योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. ही 2 वर्षांची ठेव योजना आहे. दोन वर्षांपासूनच ते सुरू झाले आहे. यामध्ये तुम्हाला वार्षिक 7.5% व्याज मिळेल. या खात्यात तुम्ही कमाल 2 लाख रुपये जमा करू शकता.
खात्यातून 40 टक्के रक्कमही काढता येते
विशेष बाब म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये ग्राहक आणि गैर-ग्राहक दोघेही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत कोणतीही महिला बँक ऑफ बडोदामध्ये तिचे खाते उघडू शकते. ही योजना 31 मार्च 2025 पर्यंतच लागू असेल. म्हणजेच, या योजनेअंतर्गत तुम्ही महिला आणि मुलींच्या नावे बँकेत 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करून चांगले व्याज मिळवू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतर खात्यातून 40 टक्के रक्कम काढू शकता.
किती गुंतवणूक करता येईल?
तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये दोन वर्षांमध्ये रु. 2 लाख गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर रु. 2.32 लाख मिळतील. ही योजना एफडी प्रमाणे काम करते. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिस, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक किंवा बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन खाते उघडण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करा. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मुदतीपूर्वी बंद करू शकता. खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याचे नातेवाईक खाते बंद करू शकतात.