महिलांना वार्षिक 1 लाख, LPG सिलेंडर 500 रुपयांना देणार ; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा ‘जाहीरनामा’ प्रसिद्ध

पुणे । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आहे. या शपथनाम्यातून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव यांसह घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण, जीएसटी मध्ये बदल या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार वंदना चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहमबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप या कार्यक्रमाला उपस्थित होते. जयंत पाटील यांनी शपथनाम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे या संदर्भातील माहिती दिली आहे.

जाहीरनाम्यात मांडलेले मुद्दे

– गॅसच्या किमती करून या 500 रुपयांपर्यंत निश्चित करून केंद्र सरकरकडून सबसिडी देणार.

– पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मर्यादित करू.

– केंद्र सरकारमध्ये 30 लाख शासकीय नोकऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. सत्तेत गेल्यावर रिक्त जागा भरण्याचा आग्रह धरू.

– महिलांना शासकीय नोकरीत 50 टक्के आरक्षण देऊ.

– एकच टॅक्स असला पाहिजे यासाठी राज्याला कर ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे, सरकारला अधिकार मिळवून देणार.

– डिग्री आणि डिप्लोमा पास झाल्यावर विद्यार्थ्याला साडेआठ हजार शिष्यवृत्ती देणार

– महिला आणि मुलींसाठी शिक्षणासाठी येणारे अडथळे दूर करणार

– शाळा कॉलेजमध्ये सेफ्टी ऑडिट करणार

– शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर. त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करू

– सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू.

– आरक्षणाची 50 टक्क्यांची अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करू

– खाजगी कॉलेजमध्ये आरक्षण ठेवण्याचं काम करू

– जेष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करू

– आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 4 टक्क्यांपर्यंत करू

– शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 6 टक्क्यांपर्यंत करू

– शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी असणार

– खाजगीकरण आम्ही मर्यादा आणू

– अग्निवीर योजना आम्ही बंद करू

– वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही, आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू

– प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख देऊ

– अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू