महिलांनो सावधान! रस्त्यावर रडणारं मुलं मदत मागत असेल तर…

नवी दिल्ली : महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महिला व तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी गुन्हेगारांकडून नवनवे प्रयोग केले जातात. असाच एक नवा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला असून नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (एनसीआयबी)ने महिलांना सावधान केले आहे. लहान मुलांच्या माध्यमातून अपहरण किंवा बालत्काराच्या उद्देशाने गुन्हेगारांच्या टोळ्या महिलांना आणि तरुणींना लक्ष्य करु शकतात असा इशारा एनसीआयबीने दिला आहे.

तुम्हाला रस्त्यावर एखादं लहान मुलं रडताना दिसलं. तुम्ही त्याच्या जवळ गेलात आणि त्याने हातामधील एका कागदाच्या तुकड्यावर लिहिलेला पत्ता दाखवून घरचा पत्ता असल्याचं सांगत इथे मला सोडा असं सांगितल्यास अशा मुलांना थेट पोलिस स्टेशनला घेऊन जा किंवा १०० अथवा ११२ क्रमांकावर फोन करुन पोलिसांची मदत घ्या, असं आवाहन राष्ट्रीय गुन्हे तपास यंत्रणेनं केलं आहे. ट्रॅप म्हणून अशा छोट्या मुलांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.

एकट्याने जाणार्‍या महिलांना आणि तरुणींना अशा मदत मागणार्‍या मुलांच्या बहाण्याने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न गुन्हेगार करु शकतात. शाळा, कॉलेज, कार्यालयामध्ये किंवा स्थानिक बाजारपेठेत एकट्याने जाणार्‍या महिलांना ट्रॅपमध्ये अडवण्याची शक्यता अधिक असते. लहान मुलांच्या माध्यमातून अपहरण किंवा बालत्काराच्या उद्देशाने गुन्हेगारांच्या टोळ्या महिलांना आणि तरुणींना लक्ष्य करु शकतात असा इशारा एनसीआयबीने दिला आहे.