जळगाव : अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका २६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार धरणगाव शहरातील एका परिसरात घडला. या प्रकरणी सोमवार, ८ रोजी पीडितेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
धरणगाव शहरातील एका भागात २६ वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. दरम्यान, भुषण सुकलाल महाजन याने महिलेचा अंघोळ करताना व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केला.
फिर्यादीनुसार, जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ दरम्यान त्याने ३ ते ४ वेळा पीडितेवर अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून पीडितेने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात भूषण महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.