भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी तो बातम्यांपासून दूर राहत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने तो चर्चेत राहतो. यावेळी सोशल मीडियावर धोनीच्या ट्रेंडमागचं कारण काही औरच आहे. कारण महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये धोनी हुक्का ओढत असल्याचा दावा केला जात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये धोनी एका पार्टीत दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा सूट घातला आहे. माहीचे लांबसडक केसही त्याला खूप शोभत होते. व्हिडिओमध्ये धोनी काही लोकांसोबत उभा राहून बोलत आहे. त्याच्या हातात हुक्का पाइपही दिसत आहे. व्हिडिओमध्ये धोनी हुक्का ओढताना आणि तोंडातून धूर सोडतानाही दिसत होता. त्याच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
माहीचा व्हिडिओ पाहून काही चाहते त्याच्यावर टीका करत आहेत. काही जण त्याच्या बचावातही उतरले आहेत. माजी दिग्गज खेळाडू आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार जॉर्ज बेली यांनीही खुलासा केला होता की, धोनी तरुण खेळाडूंसोबतचे संबंध सुधारण्यासाठी कधी कधी हुक्का ओढतो.
Herbal shisha hay! It's good for health and contains no tobacco ????????
Stop trolling MS Dhoni! He's a legend. Rival fans should stay away from Mahi ❌ https://t.co/F1SjaEY7ya
— Farid Khan (@_FaridKhan) January 6, 2024
माहीला हुक्का ओढायला आवडते, असे त्याने सांगितले होते. जॉर्ज एमएस धोनीसोबत आयपीएल 2009, 2012 आणि 2016 मध्ये खेळला आहे. 2009 आणि 2012 मध्ये, बेली चेन्नई सुपर किंग्ज आणि 2016 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सशी संबंधित होता. एमएस धोनी देखील दोन्ही संघांचा एक भाग होता.