‘मागे गाडी येत आहे’, एरंडोल विभागाच्या एसटी चालक -वाहकांची मनमानी थांबेल का ?

एरंडोलच्या एस.टी. विभागातील वाहक चालकांच्या मनमानी कारभाराला प्रवासी वैतागले आहेत. वाहन वेळेवर न येणे, वेळेवर येऊनही न थांबविणे, प्रवाशांना बस थांब्यावर न उतरविणे. यासारख्या मनमानी कारभाराला प्रवासी कंटाळलेले आहेत. यात सर्वाधिक त्रास नियमित ये-जा करणारे कर्मचारी व शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहे.

एरंडोल आगाराच्या भडगावकडून एरंडोल जाणाऱ्या बसेसला, बस स्टॅन्डमध्ये जाण्यासाठी धरणगाव चौफुली वरून बस स्टँड कडे यावे लागते. तेव्हा शासकीय कामासाठी जाणारे प्रवासी, कर्मचारी ,शाळा -कॉलेजचे विद्यार्थी यांना धरणगाव चौफुलीवर उतरायचे असते, मात्र अनेक वाहक त्या प्रवाशांना तिथे न उतरविता बस स्टैंड वर आणून सोडतात .जळगाव वरून येणाऱ्या, धरणगाव -चोपड्या वरून येणाऱ्या, म्हसावद कडून येणाऱ्या सर्व गाड्यांचे प्रवासी तिथे चौफुलीवर उतरतात. मात्र फक्त भडगाव वरून एरंडोल जाणाऱ्या बसेसमुळेच धरणगाव चौफुलीवर गर्दी होते का? भडगाव गाड्यांमुळेच अपघात होतात का? पुला खालून आपल्याला जावेच लागते. तुम्ही प्रवाशांना सोडण्यासाठी स्वतंत्र जात नाही ? मग हे अडवणुकीचे धोरण का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.ड्रायव्हर आणि कंडक्टर चे ओळखीच्या लोकांना उतरवून बाकी प्रवाश्यांना “इथे बेल देणार नाही.”असे ठणकावून सांगितले जाते.तसेच महिला कंडक्टर तर इतर महिलांना नीट बोलत नाहीत.भांडणाच्या पवित्र्यात असतात.

अनेक गाड्यांच्या धावण्यात अनियमितता असते. काही वेळस खूप वेळ बस थांब्यावर प्रवाशांना गाडीची वाट बघावी लागते. उशिराने आलेल्या गाडीला हात दिला, तर “मागे गाडी येत आहे “असे खोटे सांगून पळून जातात. अनेक प्रवाशांना महत्त्वाच्या कामासाठी वेळेवर जायचे असते. मात्र त्यानंतर बराच वेळ बसच येत नाही. एरंडोल भडगाव साठी ठराविक अंतराच्या वेळेवर बसेसचे वेळापत्रक आहे .मात्र बऱ्याच वेळा दोन- दोन, तीन -तीन बसेस एकामागे एक धावतात. त्याचा प्रवाशांना त्रास होतो. अनेक वेळा फाट्यांवर बसेस थांबविल्या जात नाही. यासंदर्भात वरिष्ठांनी दखल घेऊन आपल्या वाहक व चालकांना सुचित करावे, अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे. अन्यथा एखाद्या दिवशी अनअपेक्षित प्रवासी रस्त्यावर उतरतील ती वेळ येऊ नये म्हणून वरिष्ठांनी तात्काळ दखल घ्यावी.