---Advertisement---

माजी आएएस अधिकाऱ्याकडून महिलेला मारहाण, जाणून घ्या कारण? व्हिडीओ व्हायरल

---Advertisement---

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये लिफ्टमधून कुत्रा नेण्यावरुन वाद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक महिला आणि एक पुरुष यांच्यात बाचाबाची होताना दिसत आहे. एवढेच नाही तर त्या पुरुषाने महिलेला चापटही मारली आहे.

सोमवार ३० ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. नोएडाच्या सेक्टर १०८ मध्ये असलेल्या पार्क लॉरेट हाउसिंग सोसायटीमध्ये लिफ्टमधून कुत्रा घेऊन जाण्यावरुन हा वाद झाला आहे. एक महिला कुत्र्याला लिफ्टमधून नेत असताना एका पुरुषाने तिला विरोध केला. हा पुरुष माजी आयएएस अधिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडीओमध्ये महिला आणि पुरुषामध्ये वाद होताना दिसत आहे. यातच माजी आयएएस अधिकाऱ्याने संबंधित महिलेचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेला याचा राग आल्याने तिने संतापून त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत फेकून दिला. यावर माजी अधिकाऱ्याने महिलेला चापट मारली. त्यानंतर दोघांमधील वाद चिघळला.
यासंबंधी आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक पुरुष माजी अधिकाऱ्याला मारताना दिसत आहे. हा पुरुष त्या महिलेचा पती असल्याचे सांगण्यात येत आहे. नोएडा पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत तपासणीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment