एरंडोल : तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी समर्थक व कार्यकर्त्यांचा १० मे रोजी हिमालय मंगल कार्यालयात मेळावा होऊन एरंडोल ,पारोळा व धरणगाव तालुक्याच्या विकासासाठी भाजपा सरकारावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेती सिंचनाचा प्रश्न लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करणे या प्रश्नांवर चर्चा होऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपात प्रवेश करणे हितावह ठरणार आहे असा सूर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
अंजनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम, खडके सिम लघु तलावाची उंची वाढ, वाघ्या बर्डी प्रकल्प, हे प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी व एरंडोल धरणगाव पारोळा तालुक्याच्या सर्वांगी विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करीत आहोत अशी भूमिका माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी मेळाव्या प्रसंगी विशद केली. या मेळाव्या प्रसंगी महेंद्रसिंग पाटील यांचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.