माजी मंत्री डॉ. सुभाष भामरेंच्या निवेदनाची दखल; अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सोडले पाणी

धुळे : साक्री तालुक्यातील मुख्य धरण लाठीपाडा व मालनगाव हे दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे सदर पाणी हे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात आल्याने अक्कलपाडा धरणात जलसाठा देखील पुरेसा प्रमाणात झाल्याने. अक्कलपाडा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून धुळे तालुक्यातील लघु प्रकल्प भरण्यात यावे यासाठी माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे भाजपचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना ३१ जुलै २०२४ रोजी निवेदन दिले होते. सदर निवेदनाची दाखल घेत आज डाव्या व उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे व भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या हस्ते आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी कालव्यात पाणी सोडण्यात आले. यामध्ये अक्कलपाडा धरणाच्या उजव्या कालव्यातून अकलाड ता. धुळे येथील लोंढा लघु प्रकल्प, उडणे येथील पाझर तलाव, गोताने येथील पाझर तलाव, हरण्यामाळ तलाव व नकाणे तलाव भरण्यात यावे. तसेच डाव्या कालव्यातून शिरधाणे प्र.नेर येथील खाऱ्या धरण, मेहेरगाव, निमडाळे, गोंदूर येथील देखील तलाव भरण्यात यावे. यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात मदत होऊ शकते असे माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी निवेदनात म्हटले होते.

आज रोजी माजी मंत्री व भाजपाचे पदाधिकारी यांनी जलपूजन करून सदर कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यामुळे शेतात- यांना दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या समवेत जि.प. सदस्य संग्राम पाटील मा.जि प सदस्य शंकर खलाणे, माजी जि.प सदस्य अजय माळी, तालुकाध्यक्ष बबलू शेठ, रितेश परदेशी, संजय कपूर, आर.डी.माळी, उमेश जयस्वाल, मोहन दगा माळी, संजय सैंदाणे, विकास वाघ, साहेबराव गवळे, दीपक खलाणे, वसंत देशमुख, वसंत सोनवणे, बापू बाविस्कर, प्रकाश सूर्यवंशी, प्रशांत खलाणे, आदि पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.