‘माझं प्रकरण सीमा हैदर सारखं…’, अंजूची पाकिस्तानातून प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून भारतीय माध्यमांमध्ये सीमा हैदर हिची प्रेम कहाणी चांगलीच गाजत आहे. पाकिस्तानातील आपलं घर विकून सीमा हैदर ही सचिन नावाच्या तरुणाला भेटसाठी भारतात आली. शिवाय तिने सचिनसोबत लग्न करून हिंदू धर्म स्वीकारल्याचं सांगितलं. यावरून गदारोळ सुरू असतानाच आता भारतातील विवाहित महिलेने पाकिस्तानातील आपल्या मित्राला भेटण्यासाठी थेट लाहोर गाठलंय.राजस्थानमधील रहिवासी असलेल्या अंजूने प्रियकर नसरुल्लासाठी थेट पाकिस्तान गाठलं आहे. दरम्यान, पाकिस्तानी प्रियकरासाठी देश सोडणारी अंजूने एका खासही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली सर्व कथा सांगितली आहे.

‘माझं प्रकरण सीमा हैदर सारखं नाहीय. मी फक्त इथे फिरण्यासाठी आलीय…’ असं राजस्थान भिवाडीमधून पाकिस्तानात आलेल्य अंजूने म्हटलय. नसरुल्ला सोबत साखरपुडा आणि लग्नाबाबत जी चर्चा सुरु आहे, ते सर्व चुकीच आहे. वाढवून-चढवून गोष्टी सांगितल्या जात आहेत असं अंजू म्हणाली.

फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूने स्पष्टपणे सांगितल की, “मी जेव्हा पाकिस्तानातून भारतात परत येईन, तेव्हा नवऱ्यापासून विभक्त होईन. कारण माझे आधीपासूनच त्याच्यासोबत संबंध खराब आहेत” पाकिस्तानी मित्र नसरुल्लासोबत लग्न करण्याच्या वृत्ताचा इन्कार केला.

काही दिवसांपूर्वी 35 वर्षांची अंजू आपल्या घरातून निघाली व थेट पाकिस्तानात जाऊन पोहोचली. मी नवऱ्याला जयपूरला जाण्याविषयी बोलली होती, असं तिने इंटरव्यूमध्ये सांगितलं. अमृतसरच्या वाघा बॉर्डरवरुन ती पाकिस्तानात पोहोचली. इथे फक्त एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आली आहे. हा फिरण्यासारखा भाग होता, म्हणून इथे आले असं अंजू म्हणाली.

अंजूने नसरुल्लासोबत झालेल्या मैत्रीबद्दलही सांगितलं. “2 वर्षांपूर्वी फेसबुकवर आमची मैत्री झाली. कामाबाबत आमच्यात बोलण सुरु झालं होतं. त्यानंतर मैत्री झाली. त्यानंतर मी इथे आली. माझी सीमा हैदरसोबत तुलना करणं चुकीच आहे” असं तिने सांगितलं.

भिवाडीमध्ये असलेल्या आपल्या कुटुंबाबद्दल अंजूने महत्वाची माहिती दिली. “मला माझ्या पतीपासून वेगळ व्हायच असून मला फक्त माझ्या मुलांसोबत रहायच आहे. माझे सुरुवातीपासून नवऱ्याबरोबर चांगले संबंध नव्हते. मी नाईलाजाने त्यांच्यासोबत आहे. मी आतापर्यंत नवऱ्यासोबत राहत होते. पण आता परत गेल्यानंतर मला स्वतंत्र रहायच आहे” असं अंजू म्हणाली.

अंजूच्या नवऱ्याने अजून याबद्दल पोलिसात तक्रार दिलेली नाही. अंजूने फक्त मला जयपूरला जाणार असल्याच सांगितलं होतं, अस तिचा नवरा म्हणाला. पाकिस्तानात जाण्यासाठी तिला व्हिसा कसा मिळाला? या बद्दल आपल्याला माहित नाही, असं अंजूचा नवरा म्हणाला.