---Advertisement---

“माझा शेवटचा जय महाराष्ट्र! ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्याचा राजीनामा

---Advertisement---

मुंबई । सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र अशातच बड्या महिला नेत्याने शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे.

ठाकरे गटाच्या पुर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्ष प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, शिल्पा बोडखे यांनी ट्विट करत राजीनामा देण्यामागचे कारणही सांगितले


काय म्हटलं आहे ट्विटमध्ये
“माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र! माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेजी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे,”

“मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे देखील अभिनंदन पुढे देखील शिवसेना भवनात बसुन असेच कार्य करत रहा, आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येवून सावजी वर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा,” असा घणाघाती आरोप शिल्पा बोडके यांनी केला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment