‘माणुसकी अजून जिवंत आहे’ या व्यक्तीनं असं काय केलं ? त्याचं होतंय कौतुक

आज जर तुम्ही कुणासोबत दहा मिनिटे बसलात तर तुम्हाला समजेल की हे जग स्वार्थी आहे आणि इथे प्रत्येकजण स्वार्थासाठी जगतो. आजच्या काळात परिस्थिती अशी आहे की अनेकजण स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचे वाईट करण्याआधी दोनदा विचारही करत नाहीत, पण या कलयुगी जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे. असे काही लोक असतात ज्यांना स्वतःच्या जिवाबरोबरच इतरांच्याही जीवाची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांच्या कथा समोर आल्या की लगेच व्हायरल होतात. या संदर्भातील एक घटना सध्या चर्चेत आहे.

हे प्रकरण बेंगळुरूच्या नागनहल्ली मेन रोडचे आहे. या रस्त्यावर एका व्यक्तीचे पर्स हरवले.  जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याची ती पर्स परत मिळण्याची आशा जवळजवळ संपुष्टात आली होती, पण दुसऱ्या दिवशी त्याला एका माणसाचा फोन आला ज्याने त्याला सांगितले की त्याला त्याची पर्स परत करायची आहे, ज्यामध्ये रोख रक्कम आणि काही कार्डे होती . त्याने पत्ता विचारला आणि दुसऱ्या दिवशी कार्ड परत करायला तो तिथे आला. त्या व्यक्तीने पर्स दिली आणि पैसे आणि कार्ड सुरक्षित आहेत का ते तपासण्यास सांगितले.

होतंय कौतुक 

‘मी त्याचे खूप आभार मानले आणि माझा नंबर कसा आला ते विचारले. त्यावर त्या व्यक्तीने तुमच्या पर्समध्ये बिल असल्याचे सांगितले. ज्यावर तुमचा नंबर होता आणि मग मी तिथून तुमच्याशी संपर्क साधला आणि ही पर्स तुम्हाला परत करायला आलो. त्या व्यक्तीने पुढे सांगितले की जेव्हा मी त्याला बक्षीस देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला आणि सांगितले की आपण कमावलेले पैसे कधीच आपल्याजवळ राहत नाहीत, मग दुसऱ्याची कमाई ठेवण्याचा काय अर्थ आहे. ही पोस्ट X वर @VoiceOfParents2 नावाच्या खात्याद्वारे शेअर केली गेली आहे. ज्याला पाहून सर्वजण या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.