---Advertisement---

मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराकडून कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

---Advertisement---

जळगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जळगांव जिल्हा कार्यालयास सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता एनएसएफडीसी योजनेचे खालील प्रमाणे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. योजनेचे कर्ज प्रस्ताव जळगाव जिल्हयातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराकडून https://beta.slasdc.org या वेबसाईटवर मागविण्यात येत आहे.

योजनेचे नाव – सुविधा कर्ज योजना, भौतिक उद्दिष्ट – 40, प्रकल्प मर्यादा – ५,००,०००/-

आर्थिक उद्दिष्ट (लाखात) – २००.००, महिला समृध्दी योजना – भौतिक उद्दिष्ट – २५, प्रकल्प मर्यादा – १,४०,०००/- आर्थिक उद्दिष्ट (लाखात) – ३५.००

जळगाव जिल्हयातील मांग/मातंग समाजातील इच्छुक अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण व ५० वर्षापेक्षा जास्त नसावे शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.३ लाख पेक्षा जास्त नसावे, तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून सदर योजनेत साधारपणे समाविष्ट लघु व्यवसाय उदा, मोबाईल सर्व्हिसींग/रिपेअरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरींग फ्रिज, एस, सी, टी.व्ही मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डवेअर, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग टेलरिंग, फुड प्राडक्स/प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल / स्टेशनरी स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फेब्रीकेशन/ वेल्डींग, हार्डवेअर व सेनेटरी शॉप, प्रिंटीग, शिवनकला, झेरॉथ्स / रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार मॅकेनिक/रिपेअर, शेतीशी निगडीत पुरक/जोडव्यवसाय तसेच वाहन इत्यादी व्यवसायास तसेच वाहन इत्यादी व्यवसायासाठी कर्ज मागणी प्रस्ताव online सादर करावे.

ऑनलाईन कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे – जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड (समोरचे पान व शेवटचे पान), आधार कार्ड समोरील बाजु व पाठीमागील बाजु, पॅन कार्ड, व्यवसायाचे दरपत्रक कोटेशन, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या कठकाणची भाडेपावती, भाडे करारनामा किंवा मालकी हक्काचा पुरावा नमुना नं.८, लाईट बील व टॅक्स पावतीसह प्रतिज्ञापत्र बॉन्डवर नोटरी सह, ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा शॉपॲक्ट लायसन्स, उदयोग आधार परवाना, व्यवसायासबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयं घोषणापत्र अर्जदाराचे, सिबील क्रेडीट स्कोअर ५०० असावा, बॅकेची पासबुक झेराक्स, वाहन खरेदीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आर.टी.ओ. कडील प्रवासी वाहतुक परवाना, प्रकल्प अहवाल वरील योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या वेबसाईटवर दिलेल्या सुचनेनुसार दि. २३ फेब्रुवारी २०२४ ते दि.२५ मार्च २०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व सादर केलेल्या कर्ज मागणी अर्जाची व त्याचसोबत अपलोड केलेल्या संपूर्ण कागदपत्रांची ३ प्रतीत (हार्ड कॉपी) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी नगर स्टज्ञॅप समोर, हातनुर कॉलनी, जळगाव येथे दि. २५ मार्च, २०२४ कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते ६. १५ वाजेपर्यंत सादर करावी.

सुविधा कर्ज योजना या योजनेचे कर्ज मागणी अर्ज स्त्री व पुरुष हे अपलोड करातील, महिला समृध्दी योजनेचे कर्ज मागणी अर्ज फक्त महिला अर्जदार अपलोड करतील, सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थीचे कर्ज प्रकरण लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयात मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल, सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजना पैकी अर्जदार एकाच योजनेचा कर्ज प्रस्ताव अपलोड करु शकतील, सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजना या दोन योजने अंतर्गत उद्दिष्टापेक्षा जास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णय क्र. म.क.वा. २०१२/ प्र.क्र. १४९/ महामंडळ दिनांक १४ मे, २०१२ नुसार लाभार्थीचे निवड लॉटरी पध्दतीने केला जाईल असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक तारचंद कसबे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्यादित) जळगाव यांनी केले आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment