जळगाव : शहरातील मातृशक्ती समूहाद्वारे ६ नोव्हेंबर रविवार रोजी संध्या. ६ वा., महाबळ रोड वरील काव्यरत्नावली चौक, भाऊंच्या उद्याना समोर भव्य तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भगवान श्रीकृष्णांची महाबळ चौकातून ढोल ताशे, लेझीम टिपऱ्या आणि झांज नृत्याच्या तालावर पालखी मिरवणूक निघणार आहे.
तुलसी विवाह सोहळ्यानंतर आनंद मेळ्याव्याचे आयोजन केले आहे. त्यात विविध रुचकर खाद्यपदार्थांचा उपस्थित नागरिकांना आस्वाद घेता येईल. भव्य विवाह सोहळा, भगवान श्रीकृष्णांची वाजत गाजत मिरवणूक व आनंदमेळा असा तिहेरी आनंद उपस्थित नागरिकांना घेता येईल. या थाटामाटात होणाऱ्या, अविस्मरणीय, मंगलमय अशा संस्कार सोहळ्यासाठी शहरातील नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार, इष्टमित्र-मित्रमैत्रिणींसह उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.