“मातोश्रीची मम्मी आरक्षणावर गप्प का ?” कुणी केला सवाल

उठसुठ तुम्ही मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडे बोट दाखवता, मग राहूल गांधी यांची भुमिका काय आहे? त्यांनी साध एक ट्विट तरी केल आहे का? मातोश्रीची मम्मी आरक्षणावर गप्प का? असा सवालच भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना, उबाठा शिष्टमंडळ राष्ट्रपती यांना भेटणार असल्याचे सांगितले. यावर नितेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नितेश राणे म्हणाले, “राहुल गांधी यांची आरक्षणावर भुमिका काय आहे? त्यांनी साध एक ट्विट तरी केल आहे का? पाच राज्यांत जाऊन विष पेरत आहे. त्यांना एक फोन करायला वेळ नाही. संजय राऊत यांच्या मातोश्री वरील मम्मीला सांगा की राहूल गांधी यांनी एक तरी ट्विट करा. दिवाळीच्या आधी जरांगे पाटील यांना गोड बातमी देऊ आणि त्यांच्या सोबत आम्ही फराळ खाऊ.”
आयफोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना राणे म्हणाले, “मातोश्री वरुन वरच्या मजल्यावर बसुन फोन हॅकींग सपरू होते. आमच्यासारखे कडवट आहेत त्यांचे फोन हॅक केले जायचे. याची माहिती संजय राऊत यांनी द्यावी नाही तर मी ही माहिती जनतेला देऊ शकतो. संदीप देशपांडे आणि इतर १० ते ११ जणांचे फोन हॅक केले होते. त्यासाठी कोणत्या वहिनीने पैसे देत होते ते मी सांगू शकतो. आमच्यावर वॉच ठेवण्यासाठी करत होते.” असं नितेश राणे म्हणाले.