मुंबई । यंदा उशिरा दाखल झालेल्या मान्सून पावसाने उशिरानेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थानमधून सुरूवात झाली असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने राजस्थानमधून परतीचा प्रवास उशिराने सुरु केला आहे. खरंतर मान्सून राजस्थानमधून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो. परंतु यंदा उशिराने २५ सप्टेंबरपासून मान्सूनने परत फिरण्यास सुरुवात केल्याची माहिती आयएमडीने दिली. या वर्षी देशात मान्सूनने २ महिने आणि २३ दिवस आपला मुक्काम केला. आता राजस्थानमधून नौखरा, जोधपूरमधून परत जाण्यासा सुरुवात केली आहे.
दरम्यान, दरवर्षी ७ जून रोजी येणारा मान्सून यंदा राज्यात २५ जून रोजी दाखल झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यात धोधो बरसल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली. यामुळे सर्वच क्षेत्रात चिंता व्यक्त होऊ लागली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात पुन्हा जोरदार पाऊस झाला.
मागील काही दिवसात राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपला आहे. दरम्यान, आता मान्सूनचा परतीचा प्रवासाचे वेध लागले आहे. राजस्थानमधून मान्सूनने उशिरानेच परतीचा प्रवास सुरु केला. सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सून माघारी फिरत आहे.
महाराष्ट्रातून कधी परणार मान्सून
महाराष्ट्रातून ५ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. राजस्थानमधून मान्सून माघारी फिरत असला तरी राज्यातून अजूनही सक्रीय आहे. आज २६ सप्टेंबर रोजी राज्यात धुळे, नंदुरबार जिल्हा वगळता सर्वत्र यलो अलर्ट दिला. कोकण, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या