तरुण भारत लाईव्ह| १९ सप्टेंबर २०२३| राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली पण आज गणपतीच्या आगमनाच्या दिवशी सुद्धा पाऊसपडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्यापासून विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
काही दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्याना काहीसा दिलासा मिळाला. येणाऱ्या आठवड्यात राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय झाले असून कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच रायगड, ठाणे, पुणे जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड. पुणे, ठाणे, या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.