---Advertisement---

मालगाडीचा धक्का लागल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू, नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळील घटना

---Advertisement---

पाचोरा : नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या मालगाडीचा धक्का लागल्याने एका अनोळखी वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली. याबाबत पाचोरा रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ 18 रोजी दुपारी साडेतीन वाजे पूर्वी (वेळ नक्की नाही ) रेल्वे किमी नंबर 353/ 5 – 7 च्या दरम्यान एका वयोवृद्ध अनोळखी महिलेचा मालगाडीचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.   मयत अनोळखी महिलेचे (60) वर्षे असून उंची -170cm, रंग गोरा, शरीर बांधा सड पातळ, डोक्याचे केस काळे पांढरे लांब, नाक बसके, डोळे बारीक, चेहरा डोके फुटल्याने विद्रूप झालेला आहे.

उजव्या हातावर फुलाचे चित्र गोंधलेले, अंगात पोपटी रंगाचे ब्लाऊज, नेसनिस निळे, पांढरे, ठिपके असलेली प्रिंटेड साडी, सदरील घटनेची माहिती नगरदेवळा रेल्वे स्थानक चे उपस्टेशन प्रबंधक संजीव कुमार यांनी पाचोरा रेल्वे पोलिसांना दिल्याने पोलिसांनी जय मल्हार ॲम्बुलन्स चालत अमोल पाटील याससोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करून शव पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ॲम्बुलन्सने हलविण्यात आले. सदर घटने प्रकरणी पाचोरा रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रामराव इंगळे हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment