मालदीवच्या संसदेत खासदारांची हाणामारी; काय आहे कारण ? पहा व्हिडिओ

मालदीवच्या संसदेत चक्क खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. मालदीवच्या संसदेत रविवारी अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला जाणार होता.

संसदेत कामकाज सुरू असताना सत्ताधारी खासदारांनी कामात व्यत्यय आणला. सत्ताधारी पीपीएम आणि पीएनसी या पक्षांच्या आघाडी सरकारविरुद्ध विरोधी एमडीपी पक्षाने अविश्वास ठराव आणला होता.

त्यावर रविवारी मतदान होणार होते. दुपारी दीड वाजता मंत्र्यांची मंजुरी निश्चित करण्यात आली होती. तथापि, अनेक पीएनसी सदस्यांनी सभागृहात अडथळा आणला आणि अधिवेशनात व्यत्यय आणला. तेव्हा खासदारांत मारामारी झाली.