‘माविआ’चं ठरलं ! रावेरमधून एकनाथ खडसे तर जळगाव… जाणून घ्या सविस्तर

जळगाव : राज्यभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्षांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जय्यत तयारी सुरू केली आहे. एकीकडे पक्ष सभा, दौरे, जागावाटप यांच्यात व्यस्त असतानाच दुसरीकडे चर्चा सुरू आहे ती म्हणजे व्हाट्सअप विद्यापीठावर फिरणाऱ्या  ‘माविआ’च्या यादीची. ज्यामध्ये जळगाव लोकसभेसाठी हर्षल माने (ठाकरे गट)  यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर रावेर लोकसभेसाठी आमदार एकनाथ खडसे (शरदचंद्र पवार) यांना उमेदवारी देण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्व पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट २१ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १५ जागांवर लढू शकते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ९ जागा मिळू शकतात, असे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी ला २ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे, असे पुढे सुत्रांनी म्हटले आहे.