मासिक राशीभविष्य : ऑगस्ट महिना ‘या’ राशीसाठी खास

ग्रहांचे कर्क राशी परिवर्तन
06 ऑगस्टपर्यंत द्वितीय घरात बुध-शुक्र यांचा लक्ष्मीनारायण योग आहे, त्यामुळे व्यवसायात मिळालेला नफा गुंतवणे चांगले राहील. आर्थिकदृष्ट्या तुमची बाजू मजबूत असेल. 17 ऑगस्टपर्यंत मंगळ-शनिची ग्रहस्थिती राहील, त्यामुळे तुमचे कौशल्य आणि धोरण तुमच्या व्यवसायात वृद्धी करेल.<

कर्क राशीचे करिअर कसे असेल?
दशम घरात गुरू-राहूच्या चांडाळ दोषामुळे नोकरी गमावण्याची चिंता किंवा भीती वाटू शकते. पण, 17 ऑगस्टपासून सूर्याच्या दशम घरातून नववा-पंचम राजयोग असेल, त्यामुळे या महिन्यात बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते. दशम घरात केतूची सप्तम दृष्टी असल्यामुळे नोकरीतील कामाचा ताण जास्त राहील. त्यामुळे तुमची चिडचिडही होऊ शकते.

कर्क राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?
6 ऑगस्टपर्यंत द्वितीय घरात बुध-शुक्र यांचा लक्ष्मीनारायण योग असेल, त्यामुळे ऑगस्टमध्ये जोडीदाराबरोबरचे नाते आणि बंध अधिक दृढ होतील. 7 ऑगस्टपासून, सप्तम घरात शुक्राच्या सप्तमात असल्यामुळे प्रेम जीवनासाठी काळ अनुकूल आहे. 18 ऑगस्टपासून मंगळाच्या सातव्या घरातून नववा-पंचवा राजयोग असेल, त्यामुळे या महिन्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही बाबतीत तुमच्या निर्णयाचे स्वागत करतील.

विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना कसा असेल?
17 ऑगस्टपर्यंत पाचव्या घरात मंगळाच्या चतुर्थस्थानामुळे ज्ञान, विद्या घेणाऱ्या शिष्याला गुरुंना भेटण्याची संधी मिळेल. 06 ऑगस्टपर्यंत गुरू-शुक्र नवमा-पंचम रास योग आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबासह तुमचे शिक्षक उच्च शिक्षणात तुम्हाला मदत करतील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रकल्प लवकर पूर्ण करू शकाल. पंचम भावात शनीच्या दशमात असल्यामुळे डिझायनिंग, इंजिनीअरिंग, आयटी लोकांसाठी काळ अनुकूल राहील.

कर्क राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती
सहाव्या घरात गुरूच्या नवव्या राशीमुळे ऑगस्ट महिनाभर पौष्टिक आहाराचं सेवन करा. आठव्या घरात बुधाची सप्तम दृष्टी असल्यामुळे, व्यवसायासाठी केलेला प्रवास अनुकूल राहील. 18 ऑगस्टपासून सहाव्या घरात मंगळाच्या चतुर्थ स्थानामुळे या महिन्यात तुम्हाला फुफ्फुस किंवा यकृताशी संबंधित आजार होऊ शकतात, काळजी घ्या. 23 ऑगस्टपासून बुध प्रतिगामी राहील, त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील.