माही बोअरवेलमध्ये पडली, 9 तासांनंतर काढले बाहेर; पण जीवनाची लढाई हरली

बोअरवेलच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आल्या आहेत, अशी एक घटना समोर आलीय. जिथे पाच वर्षांची निष्पाप माही बोअरवेलच्या खड्ड्यात पडली, तिला बाहेर काढण्यासाठी, NDRF आणि SDRF यांनी संयुक्तपणे ऑपरेशन सुरू केले. सुमारे 9 तास चाललेल्या मदत आणि बचाव कार्यानंतर माहीला बाहेर काढण्यात आले, मात्र ती जीवनाची लढाई हरली. या निष्पाप मुलीला  उपचारासाठी भोपाळला आणण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला.

माही तिच्या मामाच्या गावी आली होती आणि ती शेतात खेळत असताना बोअरवेलच्या खड्ड्यात पडली, असे सांगण्यात आले.  ती सुमारे 150 फूट खोल खड्ड्यात पडली. श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. तसेच तिच्याशी बोलण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू होती.

तब्बल ९ तासांनंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याल्यानंतर तिला भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, तेथे  मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात काल संध्याकाळी ही घटना घडली.

मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विट करून म्हटले आहे की, भोपाळमधील हमीदिया रुग्णालयात उपचारादरम्यान आज राजगड जिल्ह्यातील पिपलिया रसोडा येथे बोअरवेलमध्ये पडून एका निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. या दुःखाच्या प्रसंगी आपण सर्व निष्पाप मुलाच्या कुटुंबासोबत आहोत आणि मुलीच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.