जळगाव । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात अमरावती येथील विद्यार्थ्याने ११ सप्टेंबर रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केलीय. प्रतीक विजयराव गोरडे (वय १९, रा. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार, जिल्हा अमरावती) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून या घटनेने वसतिगृहात एकच खळबळ उडाली. दरम्यान, प्रतीक गोरडे यानी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप समजू शकले नाही. या घटनेबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांचे वसतिगृह क्रमांक तीन येथे खोली क्रमांक टी ४४७ येथे प्रतीक गोरडे हा दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. तसेच विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी होते. प्रतीक गोरडे याचे वडील शिरसगाव कसबा येथे मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.
दरम्यान, बुधवारी (ता.११) मुलांनी वसतिगृहात बसलेल्या गणपती मंडळातील आरती केली. त्यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली. काही वेळानंतर मुले जेवणावरून परतले. त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेला होता.
त्याने आत्महत्या का केली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.