मित्र मदतीसाठी फोन करून पैसे मागतोय? अवश्य द्या, पण त्याआधी ही बातमी वाचा!

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आता सायबर फसवणूक होत आहे. AI वरून मित्र आणि नातेवाईकांचा आवाज बदलून, सायबर घोटाळेबाज फोन करून फसवणूक करत आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे कोणी नातेवाईक म्हणून फोन करून मदतीच्या नावाखाली पैसे मागितले तर सावधान. यूपी सायबर क्राईम आता अलीकडच्या काही महिन्यांत नोंदवल्या गेलेल्या व्हॉईस कॉल फसवणुकीत AI चा वापर करत असल्याचे सांगितले आहे. AI च्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीबाबत एक सल्लाही जारी करण्यात आला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विस्तारामुळे सायबर घोटाळेबाजांनी लोकांची फसवणूक करण्याचा नवीन मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर फेक प्रोफाईल, ओटीपीसह इतर मार्गांनी फसवणूक केली जात होती, परंतु आता फसवणूक करणारे एआयच्या व्हॉईस क्लोनिंग टूलची मदत घेत आहेत. हे साधन तुमच्या आवाजाची नक्कल इतके चांगले करते की तुम्ही तुमचा आवाज आणि टूलचा आवाज यात फरक करू शकणार नाही. यासाठी सायबर गुन्हेगार प्रथम फसवणूक करणाऱ्या व्यक्तीची निवड करतात. यानंतर त्यांची सोशल मिडीया प्रोफाईल पाहिले जाते. आणि त्यातून ऑडिओ आणि व्हिडिओ निवडले जातात.

यानंतर, एआयच्या व्हॉईस क्लोनिंग टूलच्या मदतीने त्याचा आवाज क्लोन करतात. मग त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला त्याच्या आवाजात फोन केला जातो . आणि सांगितले जाते की ,त्यांचा अपघात झाला आहे किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीबद्दल सांगून फसवले जात आहे. यूपी सायबर क्राईमचे एसपी प्रा. त्रिवेणी सिंह सांगतात की, एआयच्या मदतीने एनसीआरमध्ये सायबर फसवणुकीच्या अनेक प्रकरणांचा तपास केला जात आहे. अलीकडच्या काही महिन्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहे. फसवणूकीसाठी AI वापरल्याचा संशय आहे. सायबर क्राइम टीम सर्व बाबींचा तपास करत आहे.

तीन ते पाच सेकंदांच्या आवाजासह व्हॉइस क्लोनिंग AI च्या माध्यमातून कोणाचाही आवाज कॉपी करता येतो. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर सर्च करून सायबर गुन्हेगार कोणत्याही आवाजाचे नमुने घेतात. यानंतर आवाजाचे क्लोन करून त्यांच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांना कॉल केले जातात. आवाजाचे क्लोनिंग असे आहे की पती-पत्नी, वडील आणि मुलगा देखील आवाज ओळखू शकत नाहीत.
एखाद्या नातेवाईकाचा फोन आला तर… 
 
अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मित्र, नातेवाईक असे भासवून मदत व आपत्कालीन स्थितीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करत आहेत. जर तुम्हाला एखाद्या नंबरवरून मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या आवाजात कॉल आला तर सावध व्हा. त्यांना ताबडतोब फोन करा आणि आधी माहिती घ्या मग पैसे द्या.पण जर आवाज ओळखून जर तुम्ही पैसे दिले तर तुमची फसवणुक होऊ शकते.
फसवणूक टाळण्यासाठी हे उपाय?
– वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवा, एकसारखे पासवर्ड तयार करणे टाळा.

– जर तुम्हाला एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या आवाजात पैशासाठी कॉल आला तर एकदा स्वतः फोन करून खात्री करा

– तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी असाल तर हेल्पलाइन 1930 वर तक्रार करा.