मी अडीच महिन्यापूर्वीच मंत्रिमंडळाच राजीनामा दिला.. छगन भुजबळांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई । राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा, पण काही गरज नाही दिलेला आहे मी राजीनामा.16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य करून त्यासंबंधीची अधिसूचना मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करत कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांचा ओबीसीत समावेश केला जाईल हे स्पष्ट केलं. त्यानंतर राज्यातल्या ओबीसी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काल शनिवारी अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा घेतला. या मेळाव्यातून ओबीसी समाजाला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी हे मोठं विधान केले आहे.

ते म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांना, स्व: सरकारमधील आणि स्व: पक्षातील नेत्यांना मला सांगायचे, 17 नोव्हेंबरला अंबडला माझी ओबीसीची पहिली रँली झाली. आणि 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि मंग अंबडच्या सभेला रवाना झालो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे.

मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही आहे. पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही. पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पुर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शपथ पुर्ण झाली असेल तर मागासवर्ग आयोग कशासाठी? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.