मी माफी मागतो… जनतेसमोर उद्धव ठाकरे असं का म्हणाले ? 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत पंतप्रधानांसाठी मते मागितल्याबद्दल माफी मागतो, असे ते म्हणाले.

पश्चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार सत्यजित पाटील यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आणि त्यांचे महाविकास आघाडीचे सहयोगी आणि राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

या भाषणादरम्यान ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राचा विश्वासघात केला असून, यापूर्वीच्या निवडणुकीत पंतप्रधानांसाठी मते मागितल्याबद्दल जनतेची माफी मागत आहे, असे ते म्हणाले.