मी लपून-छपून जाणार नाही.. भाजप जाण्याच्या चर्चेवर एकनाथ खडसेचं मोठं वक्तव्य

जळगाव : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार असाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेवर अखेर खडसे यांनी मौन सोडल असून यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाले खडसे?

एकनाथ खडसे म्हणाले की, मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी भाजपमध्ये जाईल तेव्हा उघडपणे जाईल. आपण भाजपमध्ये जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा आधी शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने भाजपमध्ये जाईल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर एकनाथ खडसे यांनी हे मोठे विधान केले. सध्या भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही महत्वाचे कारण नाही आणि माझी इच्छा ही नाही, अशी पुष्टी त्यांनी त्यानंतर जोडली, असेही खडसे म्हणाले.

यावेळी त्यांनी आपले राजकीय विरोधक गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. भाजपमध्ये जाण्याबाबत मला मंत्री गिरीश महाजन यांच्या परवानगीची गरज नाही. मी 40-42 वर्षांपासून भाजपमध्ये होतो. त्यामुळे गिरीश महाजन यांच्यापेक्षा माझे वरिष्ठांची चांगले संबंध आहेत. ते आजही कायम आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून माझे कोणाशी मतभेद नाही. मोदीजी, नड्डाजी, राजनाथ सिंहजी यांना मी कधी भेटलो नाही, असेही नाही. रक्षा खडसे माझ्या घरात खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी माझा भेटीगाठी होत असतात ते स्वाभाविक आहे.