मुंगेरीलालचे ‘डीएनए’ असणार्‍या नेत्यांना वाटते, सरकार पडेल; कुणी लगावला टोला?

जळगाव : खासदार संजय राऊत यांनी ‘महायुतीचे सरकार पडेल’ असे विधान केले आहे. याला प्रत्त्युत्तर देताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंगेरीलालचे ‘डीएनए’ असणार्‍या नेत्यांना हे वाटत असल्याचा टोला लगाविला आहे.

सुधीर मुनगंटीवार हे जळगाव येथे बुधवारी एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सत्तासंघर्ष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्तासंघर्ष असता तर या कार्यक्रमाला दिसलो असतो का? हजार वकील उभे राहिले की सूर्य पश्चिमेकडून उगवतो आणि एक उभा राहिला सूर्य पूर्वेकडून उगवतो कोण जिंकेल? कोर्टात कोणत्या मॅटरवर केस आहे? असे अपात्र करता येत नाही.

मी हा प्रश्न उपस्थित करत नाही तर सत्याचाच विजय होईल. ते गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतात. गैरसमज निर्माण करतात. जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द आहोत असे स्पष्ट केले. मुंगेरीलालचे डीएनए  असणारे काही नेते आहेत. आमदार अपात्र होतच नाही तर भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले.