---Advertisement---

मुंबईतील प्रवाशाचे भुसावळात भामट्यांनी लांबवले पाकिट

---Advertisement---

भुसावळ : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीत बसमध्ये चढणार्‍या वढोद्यातील तरुणाच्या खिशातील आठ हजारांची रोकड असलेले पाकिट काढून उलट त्याला मारण्याची धमकी देत शिविगाळ करणार्‍या भुसावळातील त्रिकूटाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास घडली.

त्रिकूटाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा
योगेश पद्माकर महाजन (33) हे वढोदा येथील रहिवासी असून मुंबईवरून ते भुसावळात आले व गावी जाण्यासाठी यावल बसमध्ये चढत असताना संशयीत आरोपी हसनअली उर्फ निजाय अली, सुरज अशोक भांगे व समीर शहा उर्फ टर्की नजीर शहा (सर्व रा.भुसावळ) आदींनी त्यांच्या खिशातील आठ हजारांची रोकड असलेले पाकिट काढत पळ काढला मात्र त्याचवेळी महाजन यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आरोपींचा पाठलाग केला असता आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत शिविगाळ करीत पळ काढला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात महाजन यांच्या फिर्यादीवरून तिघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment