मुंबई : मुंबईत होऊ घातलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज वरळीत ठाकरे गटाला डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशीच मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.
वरळीत लावण्यात आलेल्या बॅनर्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असून त्यात बाळासाहेब ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही,’ असे म्हणत असल्याचे दाखवण्यात आले आहे. वरळीत लावलेले हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत.