मुंबई आयकर विभागात 10वी ते पदवीधरांसाठी जम्बो भरती जाहीर

आयकर विभागात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. मुंबई आयकर विभागात भरतीची जाहिरात निघाली आहे. 10वी ते पदवीधरांना नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.

एकूण २९१ जागा या भरती मार्फत भरल्या जाणार असून ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते आयकर विभागाच्या वेबसाईट incometaxmumbai.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

ही पदे भरली जाणार :
1) इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स (ITI) 14
2) स्टेनोग्राफर 18
3) टॅक्स असिस्टंट (TA) 119
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 137
5) कॅन्टीन अटेंडंट 03

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट : 18 ते 30 वर्षे [OBC: 05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]
शुल्क : ₹200/-
वेतनश्रेणी : 18,000/- ते ते 1,42,400/- 

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online