मुंबई महानगरपालिकेत पदवीधरांसाठी मेगाभरती भरती ; दरमहा 81100 पगार मिळेल

मुंबई महानगरपालिकेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत तब्बल एक हजार ८४६ जागांसाठी मेगाभरती निघाली आहे. विशेष पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याची एक उत्तम संधी आहे.  पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ न घालवता या भरती त्वरित अर्ज करावीत.

‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या पदासाठी आज म्हणजेच दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ११.५९ मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे.

शैक्षणिक पात्रता :
(i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
आणि
(ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
किंवा
(ⅲ) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुर्णासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे असावे.
इतका पगार मिळेल?
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५००-८११०० बेसिक पगार मिळेल

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेने उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी आणि संभाव्य अडचणींसाठी ९५१३२५३२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान उमेदवारांना संपर्क साधता येणार आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा